spot_img
spot_img
spot_img

दिघी मॅगझिन परिसरात ड्रोन उडवण्याचा प्रकार; प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी, तरुणावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

दिघी मॅगझिन या अतिसंवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रात परवानगीशिवाय ड्रोन उडवत तसेच अनधिकृत प्रवेश केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तरुणाला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २१ मार्च २०२६) रोजी सायंकाळी ६.३४ वाजण्याच्या सुमारास दिघी मॅगझिन गार्ड परिसरात घडली. याबाबत शिपाई पिल्लीकोटेश्वर राव (वय ५२, रा. खडकी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे गार्ड ड्युटीवर असताना आरोपी सागर धर्माजी विटकर (वय २०, रा. भोसरी) याने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवला. या कृत्यामुळे मानवी जीवित आणि सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच, आरोपीने परिसरात प्रवेशास बंदी असतानाही सुरक्षा कुंपणाची तार उचलून अनधिकृतरित्या आत प्रवेश केला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आली आहे.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम २२३, ३२९(३), १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बी.एन.एस.एस. कलम ३५(३) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करत आहेत

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!