पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
वाकड परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून डिलिव्हरी बॉयवर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून वाकड पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, आरोपी अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी रोहितकुमार केशवप्रसाद सोनी (वय २५, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संगमेश्वर रणदिवे (रा. रहाटणी) व त्याचा एक अज्ञात साथीदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दत्तमंदिर रोडवरील सीसीडी कॅफे परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी बिग बास्केटची डिलिव्हरी पूर्ण करून स्टोअरमध्ये जात असताना पार्किंगमधून दुचाकी काढण्याच्या कारणावरून वाद झाला.
या वादातून आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीला मारहाण केली.
यावेळी एका आरोपीच्या साथीदाराने बॅगमधील वस्तूने फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर प्रहार करून त्यांना जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
वाकड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213409