spot_img
spot_img
spot_img

निघोजे येथे भरधाव ट्रकची धडक; पादचारीचा मृत्यू, चालक फरार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

निघोजे-ताखेड परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चालक फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एआर एआय चौकात ही घटना घडली. महमद नौशाद इर्शाद (वय ३०) हे रस्ता ओलांडत असताना एमएच १२ एचडी ७३७२ क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगात येत मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ट्रकचे चाक त्यांच्या डाव्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

याप्रकरणी धरजकुमार काशिनाथ राम (वय २७) यांनी फिर्याद दिली असून बीएनएस कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!