पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या फार्मसी विभागातून तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांहून अधिक किमतीची इंजेक्शन्स चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.
संदिप सुबराव लाखे (वय ४५, रा. काळेवाडी) यांनी याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रथमेश रमेश शिंदे (वय २५, रा. चिखली) याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने फार्मसीमध्ये काम करत असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ५,२२,०३५ रुपयांच्या इंजेक्शन्सची लबाडीने चोरी केली.
स्टॉक तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.



