पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
देहूरोड परिसरात शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या पानटपरी चालकावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
सदानंद विजय रूद्राक्षे (पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश विलास सोरटे (वय ३२, रा. दारूंब्रे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासनगर येथील शिंदे पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ‘चेरी पान शॉप’मध्ये आरोपी प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला व हुक्का फ्लेवरची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात सुमारे ११,९०६ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम व तंबाखू प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213407