spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत रॅपिडो बुकिंगवरून वाद; चालकाकडून प्रवाशाला मारहाण, बोट चावून जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

ऑनलाइन कॅब बुकिंगवरून झालेल्या वादातून चालकाने प्रवाशाला बेदम मारहाण करत त्याचे बोट चावून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना हिंजवडीतील ब्लू रिज सोसायटी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग भगत (वय ४२, रा. नाना पेठ, पुणे) यांनी १६ मार्च रोजी दुपारी सुमारास रॅपिडो अॅपद्वारे चारचाकी गाडी बुक केली होती.

त्यानुसार चालक संदिप काळे (वय ३०, रा. धायरी) हा संबंधित ठिकाणी पोहोचला. मात्र, गाडीच्या भाड्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढताच आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीला मारहाण केली आणि संतापाच्या भरात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व शेजारचे बोट चावून गंभीर जखमी केले.

या घटनेत करंगळी अर्धवट तुटल्याने फिर्यादी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!