पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
शहरात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत अवैधरित्या कोयता बाळगणाऱ्या तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई वाल्हेकरवाडी परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता रानमळा हॉटेलच्या पाठीमागील ओढ्यालगत संशयित हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी तपासणी केली.
यावेळी संग्राम समीर येळवंडे (वय २२, रा. थेरगाव) याच्या ताब्यातून विनापरवाना लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने त्याचा भंग केल्याचे समोर आले आहे.
जप्त केलेल्या कोयत्याची किंमत सुमारे १०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार लोहकरे करत आहेत.



