पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पुणे, चाकण (दि.१७ मार्च) : चाकण-शिक्रापूर महामार्गालगत भोसे गावाच्या हद्दीत अवैधरित्या दारू साठा करून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.
मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता समाजाची नाळ बाल अनाथ व वृद्ध आश्रमाजवळील शेडमध्ये छापा टाकण्यात आला.
यावेळी भगवान शेवाळे (वय ४५, रा. भोसे, ता. खेड) हा देशी-विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवताना आढळून आला.
या कारवाईत सुमारे १४ हजार ४३५ रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



