पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
निगडी येथील भक्ती शक्ती चौक परिसरातील स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी व्हिजन प्लस मॉलमधील “ब्लु बिल्स स्पा” येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला.
या वेळी आरोपी अमोल जाधव (वय ४०) हा दोन महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यात सुमारे २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213403