पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
तळेगाव दाभाडे परिसरात निष्काळजीपणे उभ्या केलेल्या गॅस डिलिव्हरी वाहनामुळे ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
१६ मार्च रोजी दुपारी चौराईनगर येथील सुयश ग्रीन सोसायटीसमोर हा प्रकार घडला.
आरोपींनी डिलिव्हरी वाहन उतारावर उभे करताना हँडब्रेक न लावता व गिअरमध्ये न ठेवता बेफिकिरी केली.
त्यामुळे वाहन अचानक पुढे सरकले आणि ११ वर्षीय ज्ञानेश्वरी गुहे हिला जोरदार धडक देत तिच्यावरून गेले.
या अपघातात मुलगी गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर आरोपींनी कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.





Total Users : 213397