पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
मुळशी तालुक्यातील भुगाव परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकामुळे भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१५ मार्च रोजी दुपारी माताळवाडी फाटा येथे फिर्यादी वृषाली लांडगे यांचे पती केशव लांडगे व मुलगा ऋषिकेश दुचाकीवरून घरी जात असताना, मागून आलेल्या टाटा ९०९ ट्रकने जोरदार धडक दिली.
आरोपी रवी घुले हा दारूच्या नशेत वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे.
या धडकेत केशव लांडगे गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत.





Total Users : 213397