पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथे ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिच्या अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवीशा सन्याम हिने फिर्यादीला व्हॉट्सअॅपवरील “Circle of Insight” ग्रुपमध्ये अॅड करून बनावट ट्रेडिंग वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
जास्त परताव्याचे आमिष दाखवत विविध स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले.
यामध्ये फिर्यादीची एकूण ५१ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.





Total Users : 213398