spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीतील कॅनरा बँकेत बनावट कागदपत्रांद्वारे ५.७४ कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

हिंजवडी (ता. मुळशी) येथील कॅनरा बँक शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ५ कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत.

फिर्यादी अजय म्हसकर (वय ७६, रा. हडपसर) यांच्या मालकीच्या वारवडी (ता. पुरंदर) येथील जमिनीबाबत आरोपींनी बनावट सह्या व अंगठे करून खोटे गहाणखत तयार केले.

त्यानंतर हे दस्तऐवज कॅनरा बँकेत सादर करून स्कायलिप इंडस्ट्रीजसाठी कर्ज काढण्यात आले.

तसेच फिर्यादी यांच्या नावाने बनावट केवायसी कागदपत्रांच्या आधारे सेव्हिंग अकाउंट उघडून व्यवहार करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात विश्वासघात व फसवणुकीचे गंभीर आरोप असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!