spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडे येथे सोसायटी मीटिंगमध्ये हाणामारी; महिलेसह तिघांवर हल्ला, जीवे मारण्याची धमकी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील मंत्रा सिटी 360 या सोसायटीमध्ये फेडरेशनच्या बैठकीदरम्यान वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहेत.

१५ मार्च रोजी सायंकाळी फेज १ मधील क्लब हाऊसमध्ये सोसायटीची बैठक सुरू असताना फिर्यादी रेखा वाघ (वय ५०) यांनी वेन्डर बदलण्याचा विषय मांडला. यावरून आरोपींनी त्यांना दमदाटी करत विषय मांडू दिला नाही.

त्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेमंत सपकाळ यांच्यावर आरोपींनी अचानक हल्ला केला.

फिर्यादी व इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी खुर्च्या व लोखंडी रॉडने तिघांवरही मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!