spot_img
spot_img
spot_img

मोशी गाव चौकात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : मोशी गाव चौक, पुणे–नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि.१३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता मोशी गाव चौक, पुणे–नाशिक हायवे येथे घडली.

याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी गोविंद प्रकाश गायकवाड (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भगवान सिद्धार्थ साखरे (वय २९, रा. खिरीडवस्ती, मोशी, पुणे, मुळ रा. कारला, ता. नायगाव, जि. नांदेड) असे आहे.

माहितीनुसार, भगवान साखरे हे त्यांच्या राहत्या घरातून स्प्लेंडर दुचाकी (एमएच १४ एनए ९४४३) वरून कामानिमित्त मोशी टोलनाक्याकडे जात होते. ते मोशी गाव चौकात पोहोचताच पाठीमागून येणाऱ्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या ट्रक (एमएच १६ सीझेड ९७८७) चालकाने भरधाव वेगाने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेमुळे साखरे हे रस्त्यावर पडले आणि ट्रकचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रक चालक बिलाल अस्लम बारुदवाले (वय २१, रा. शिलवंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!