spot_img
spot_img
spot_img

लवळे गावात किरकोळ वादातून तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

पुणे : मुळशी तालुक्यातील लवळे गावातील शितोळे वस्ती येथे किरकोळ वादातून एका तरुणाला मातीची कुंडी व लोखंडी पट्ट्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १२.५५ वाजता शितोळे वस्ती, स्वामी समर्थ मंदिराजवळ, लवळे गाव (ता. मुळशी, जि. पुणे) येथे ही घटना घडली. याबाबत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी रोहित संजय घाडगे (वय २९, व्यवसाय नोकरी, रा. शितोळे वस्ती, स्वामी समर्थ मंदिराजवळ, लवळे गाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे

फिर्यादीनुसार, आरोपी करण पारटे, आर्यन पारटे, आदित्य भिलारे आणि बाबू गोठल (सर्व रा. शितोळे वस्ती, लवळे गाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्यादीने त्यांच्या बहिणीसोबत का भांडण केले, याचा राग मनात ठेवून फिर्यादीवर हल्ला केला. आरोपींनी मातीची कुंडी, लोखंडी पट्टा तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला जखमी केले.

या प्रकरणी आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक बांगर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!