spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : चिंचवड परिसरातील रामनगर येथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व पत्त्यांचे पान जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.२० वाजता रामनगर, चिंचवड येथील दातीर यांच्या शेतामध्ये काही जण पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी तेथे छापा टाकला.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी भरत यलाप्पा पवार (वय ५५), सुभाष बन्सी ओहाळ (वय ५१), शिवाजी नागप्पा दोडमणी (वय ५४), मच्छिंद्र विठ्ठल पवार (वय ५२), विनायक चंद्रशेखर धुमाळ (वय ४०) आणि सुरेश महादेव धनवटे (वय ४६) (सर्व रा. चिंचवड, पुणे) यांना जुगार खेळताना पकडले.

या कारवाईत रोख रक्कम ४,१७० रुपये आणि पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत व पोलीस हवालदार भारती करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!