spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

अनुभवाला भाजपाची दाद; शहरविकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले प्रशांत शितोळे हे महापालिकेतील अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. प्रशासनाचा अनुभव, नागरी प्रश्नांची जाण आणि सभागृहातील पकड यामुळे भाजपने त्यांच्यावर सत्तारूढ पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांनी अत्यंत कमी मताधिक्याने निवडणूक जिंकली असली, तरी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आणि कामकाजाच्या धडाडीवर विश्वास ठेवत पक्षाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत शितोळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सत्तारूढ पक्षनेते म्हणून महापालिकेच्या सभागृहात विकासकामांना गती देणे, प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाचे नेतृत्व अधिक सक्षम झाले असून, अनुभवी आणि निर्णयक्षम नेतृत्व शहराच्या कारभारात पुढे आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!