spot_img
spot_img
spot_img

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीची लढत; वैशाली काळभोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका वैशाली काळभोर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असली, तरी उपमहापौर पदासाठी मात्र राजकीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली काळभोर या महापालिकेतील सक्रिय नेतृत्व मानल्या जातात. नगरसेवक म्हणून त्यांच्या दीर्घ अनुभवासोबतच शहरातील नागरी प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांच्यावर उपमहापौरपदाची जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न केला आहे.

महापौरपदावर भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला असताना, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार देत थेट राजकीय आव्हान उभे केले आहे. त्यामुळे उपमहापौर निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून महापालिकेतील सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैशाली काळभोर यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली असून, उपमहापौरपदाची निवडणूक आता केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!