spot_img
spot_img
spot_img

“मला यातलं काहीही माहिती नाही”; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवर आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण घडामोडींवर त्यांनी अतिशय मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत, “मला यातलं काहीही माहिती नाही,” असे स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत तसेच पक्षातील घडामोडींविषयी विचारणा केली असता त्यांनी केवळ एका वाक्यात आपली भूमिका मांडली.

दरम्यान, आपण सध्या दिल्लीला रवाना होत असल्याचे सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “उद्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे मला दिल्लीला जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची सभागृह नेते म्हणून माझी जबाबदारी असल्याने मी अधिवेशनासाठी दिल्लीला जात आहे.”

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असताना, सुप्रिया सुळेंच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!