spot_img
spot_img
spot_img

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’चा शुक्रवारी समारोप; शहरात वाहतूक बदल, शाळांना दुपारी १२ नंतर सुटी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा समारोप शुक्रवार, २३ जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात आले असून, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवून त्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ९९ किलोमीटर अंतराची शर्यत होणार आहे. शर्यतीचा प्रारंभ बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून होणार असून, पाषाणमार्गे एनसीएल चौक, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, पुन्हा काळेवाडी फाटा, आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक), सेनापती बापट रस्ता, बालभारती, नळस्टॉप, लक्ष्मीनारायण चौक, शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), लष्कर परिसरातील टर्फ क्लब, साधू वासवानी चौक, साखर संकुल असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे शर्यतीचा समारोप होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

वाहतुकीस बंद राहणारे प्रमुख रस्ते –

स्पर्धेदरम्यान खालील मार्ग वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहेत:

  • राधा चौक ते सुस खिंड रोड
  • पूनम बेकरी ते पाषाण चौक
  • पाषाण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • राजीव गांधी पूल
  • सेनापती बापट रस्ता
  • पत्रकार भवन ते विधी महाविद्यालय रस्ता
  • नळस्टॉप ते सेनादत्त पेठ
  • टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक
  • दगडूशेठ हलवाई चौक ते मंडई
  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (राष्ट्रभूषण चौक ते ना. सी. फडके चौक)
  • नरपतगिरी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
  • लष्कर भागातील अर्जुन चौक ते घोरपडी परिसर
  • लाल महाल चौक ते स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे)
  • गरवारे चौक ते जंगली महाराज रस्ता

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!