“रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी” उद्घाटन समारंभाचे निमित्ताने स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना… एक दिवसीय कार्यशाळा
शबनम न्यूज: प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे 67 येथे आज रयत शिक्षण संस्था संकल्पित “रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीचे” उद्घाटन संपन्न झाले, यानिमित्ताने “स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना” या विषयावर पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या निमित्ताने मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी (माजी सनदी अधिकारी) उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले “कॉलेज जीवन हे गांभीर्याने घ्यावयाचा विषय आहे.” त्यासाठी परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा सारख्या चांगल्या पर्यायाची निवड करावी. रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी चे उद्घाटक मा.चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सभागृहात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते या कार्यशाळेचे प्रस्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी केले. उद्घाटना नंतरच्या सत्रात शाश्वत ॲकॅडमी पुणे उदय कदम, महेश पाटील आणि निलेश पवार यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना चंद्रकांत दळवीसाहेब म्हणाले, रयत शिक्षण संस्थेत 43 महाविद्यालये असून, एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचा विचार करूनच रयत शिक्षण संस्थेने ‘रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी’ सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झाले असे मी जाहीर करतो. प्रथमता मी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो की, तुम्ही कॉलेजमध्ये अॅडमिशन का घेतली? शिक्षण घेण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, की डिग्री घेण्यासाठी? शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते. मला काय करायचे? हा विचार प्रवेश घेण्यापूर्वी करायचा असतो. प्रथम आपले ध्येय निश्चित केले आणि त्या दिशेने वाटचाल केली तर आपले ध्येय साध्य होऊ शकते. कॉलेज जीवन हे गांभीयनि घेण्याचा विषय आहे. तुमच्यात खूप क्षमता आहेत. तुमच्यात असणाऱ्या स्किल आणि कौशल्यावरच तुम्हाला नोकरी मिळू शकते. १ जानेवारी २०२६ पासून MPSC मार्फतच सर्व सरल सेवा भरती केली जाणार आहे. म्हणूनच आम्ही “रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी” स्थापन केली आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करावा लागेल? आता कोणत्याही सरकारी नोकऱ्या वशिल्याने लागणार नाहीत. तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस पाटील या सर्व परीक्षांसाठी लेखी परीक्षा असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. आज हजर असणाऱ्या मुलांचे करिअर चांगले घडले तरी आजचा दिवस सार्थकी लागला.
शाश्चत अॅकॅडमी पुणेचे मा. उदय कदम म्हणाले, स्वतःची ओळख निर्माण करा. विद्यार्थी म्हणजे वाहते पाणी. या पाण्याला योग्य वळण देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्था रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून करत आहे. ही तुमच्यासाठी एक संधी आहे. रयतची गंगा वाहते आहे. त्यातून आपल्या क्षमतेचे पातेले भरून घ्या. शासकीय नोकरी ही सुरक्षित नोकरी आहे.
शाखत अॅकॅडमी संचालक असणारे मा. महेश पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता काय? आपल्यातल्या कमतरता काय? हे ओळखावे. विद्यार्थ्यांनी आम्हाला रोजचे तीन तास आणि पुढील वर्ष द्या. तुम्हाला आम्ही पोस्ट मिळवून देतो. जे विद्यार्थी आमच्याकडे येतील त्यांना आम्ही परफेक्ट बनवू
शाश्वत अॅकॅडमी पुणेचे मा. नीलेश पवार यांनी शनिवारी घेण्यात येणाऱ्या स्क्रिनिंग टेस्ट स्वरूप समजावून दिले. या परीक्षेची नोंदणी गुगल फॉर्म मार्फत करावी असे त्यांनी सांगितले.
या एक दिवसीय कार्यशाळाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी केले. मा. प्राचार्यांनी सर्वांना ‘वसुंधरेची शपथ’ दिली. उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ.प्रभंजन चव्हाण व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. आभार मा. डॉ. संदीप ननावरे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.


