spot_img
spot_img
spot_img

न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘भव्य तिरंगा रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड प्रभागचे  सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, माजी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भालेराव, उद्योजक अरुण डोईफोडे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सचिव जितेश जगताप, कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, डॉ. प्रियंका कोकणे, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, मयूर ओव्हाळ, सागर शिनगारे शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. रॅलीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली. न्यू सिटी प्राईड स्कूल ते शिवार चौक ते  स्कूल  ह्या मार्गाने रॅली काढण्यात आली.

विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.शाळेच्या बँड पथकाच्या तालावर विद्यार्थी अनुशासनबद्ध रचनेतून मार्गक्रमण करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून एकात्मतेचा व देशभक्तीचा संदेश देण्यात आला. रॅली दरम्यान पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत, महिला सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व अशा सामाजिक संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.स्थानिक नागरिकांनी रॅलीचे स्वागत फुलांच्या वर्षावाने आणि टाळ्यांच्या गजरात केले.
प्री – प्राईमरीचे विद्यार्थीनी अरिका पवार, इयत्ता दुसरीचा चैतन्य कोरे, इयत्ता चौथीचा युग माने, इयत्ता सहावीची विद्यार्थिनी ईशानी सोळुंके या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली . देशभक्तिपर गीत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कल्पना चौधरी आणि अनिता पाटील यांनी झेंडा गीत गायले. उर्मिला ठोंबरे मेघा विभुते आणि डिंपल काळे या शिक्षकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये माहिती देशाबद्दल सांगितली. तसेच पद्मश्री भूषण डॉक्टर डी वाय पाटीलयांना श्रद्धांजली वाहिण्यात आली.“वंदे मातरम” म्हणून  विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली पतंगे आणि सोनाली माळी यांनी केले.तसेच पाहुण्यांचे आभार कल्पना चौधरी  यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!