spot_img
spot_img
spot_img

विमानतळ वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीसंदर्भातील अंतिम आदेश जारी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहरातील विमानतळ वाहतूक विभागांतर्गत हिंमत जाधव पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) व ११७ अन्वये अत्यावश्यक सेवेतील वाहने फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ. यांना वगळता वाहतुकीसाठी खालील अंतिम नियम लागून रहातील.

एकेरी वाहतूक घोषित रस्ते श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक – गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक तर दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग सीसीडी चौक → गंगापुरम चौक, दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक, गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक.

याआधी सदर मार्गावर अस्तित्त्वात असलेले सर्व निर्बंध रद्द करण्यात आले असून शहरातील वाहतुकीची शिस्त, सुरक्षितता व सुगमता राखण्यासाठी नागरिकांनी नव्या वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन हिंमत जाधव, पोलीस उपआयुक्त यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!