शबनम न्यूज , प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिंपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या मार्गदर्शनात संविधान दिन साजरा करण्यात आला.
तापकीर चौक येथील मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम भारतरत्नडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे, मंडळाच्या महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्ष रेणुकाताई हेगडे, उपाध्यक्ष अनिता चोपडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य रेखाताई काटे, सामाजिक कार्यकर्ते विवेक कांबळे, राम सोनवणे, प्रदीप कांबळे, सुदर्शन कांबळे, विद्याचंद्र गायकवाड, डॉक्टर मोहन शिंदे, मोहन चव्हाण, व माजी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.










