spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिरवळ येथे भीषण अपघात; चार युवकांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नेक्सॉन कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध लेनमध्ये गेल्यानंतर ट्रकवर आदळली; मृतांमध्ये मावळ तालुक्यातील तिघांचा समावेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) शिरवळ येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे १.१० वाजता हा अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार, टाटा नेक्सॉन (MH 14 LJ 3033) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रक (KA 27 C 5878) वर आदळली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमधील चार युवकांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे (१९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखिल बाळू राऊत (२०, रा. कामशेत) यांचा समावेश आहे.

या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बहुर, कामशेत) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!