शबनम न्यूज | प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे प्रेरणास्थान व संस्थापक स्वर्गीय विद्याधर चाबुकस्वार यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय विद्याधर चाबुकस्वार यांच्या प्रतिमेस रोहिणी साबळे यांनी पुष्पहार अर्पण केले व उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. शिक्षण क्षेत्राबद्दल असलेली त्यांची निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आस्था, शिस्तप्रियता आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याची त्यांची दूरदृष्टी यांचे स्मरण करण्यात आले.
स्वर्गीय विद्याधर चाबुकस्वार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रयत्न न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून सुरू आहे.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



