spot_img
spot_img
spot_img
spot_img

जुन्या पैशांच्या व्यवहारातून दिघीत तरुणावर जीवघेणा हल्ला

दिघी | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

जुन्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादात ४३ वर्षीय व्यक्तीवर फरशी, दगड आणि विटांनी डोक्यात व चेहऱ्यावर जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिघीतील विजयनगर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफूल वसंत शिंदे (वय ४३) यांच्यावर ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी गुलमोहोर सोसायटीजवळील मोकळ्या मैदानात आरोपींनी हल्ला केला. जुन्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी फरशी, दगड व विटांचा वापर करून शिंदे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार केले.

या प्रकरणी रोहन उर्फ मोन्या संजय माने (२२), युवराज मते (सुमारे ४०) आणि जना रोहन माने (३३) यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जखमी प्रफूल शिंदे यांच्यावर उपचार सुरू असून, पुढील तपास पोउपनि. शिंदे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!