spot_img
spot_img
spot_img
spot_img

बँकेच्या ताब्यातील ५६ लाखांची फॉर्च्युनर परस्पर नेली; फसवणुकीचा गुन्हा दाखल

चिंचवड | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

बँकेच्या ताब्यात असलेली तब्बल ५६ लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर बँकेची परवानगी न घेता परस्पर घेऊन गेल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना थरमॅक्स चौक, संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी हसमुख भाटी यांनी फॉर्च्युनर खरेदीसाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेकडून ४२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रकरणातील निवासी व व्यावसायिक गाळा कर्जदाराच्या नावावर नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आले होते.

दरम्यान, संबंधित फॉर्च्युनर कार एमएच १२ एक्स एक्स ५९२९ ही सिंहगड पोलिसांनी बँकेच्या ताब्यात दिली होती. मात्र, २६ जून २०२५ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास हसमुख राजाराम भाटी (वय ३५) यांनी बँकेची परवानगी न घेता बँकेसमोरील रस्त्यावरून वाहन परस्पर घेऊन गेल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी संजय वासुदेव जोशी (वय ६७) यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१६, ३१७(२), ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!