spot_img
spot_img
spot_img
spot_img

थेरगाव रुग्णालयात सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला धक्काबुक्की; हात फ्रॅक्चर

थेरगाव | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

थेरगाव रुग्णालयातील जनरल मेडिसिन वॉर्डमध्ये झोपलेल्या तरुणाला बाहेर काढताना सुरक्षा रक्षकाने पाठीमागून जोरात ओढून लोखंडी बाकड्यावर ढकलल्याने त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सुदाम भवाळ (वय २१) हा आपल्या वडिलांच्या पलंगाशेजारी खाली झोपला होता. २९ जुलै रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुरक्षा रक्षकाने त्याला झोपेतून उठवून वॉर्डबाहेर जाण्यास सांगितले.

रमेश हा वॉर्डबाहेरील पॅसेजमध्ये असलेल्या बाकड्यावर बसण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षक प्रकाश शिनगारे (वय ५५) यांनी पाठीमागून त्याला जोरात ओढून बाजूच्या लोखंडी बाकड्यावर ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत रमेशच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हाड मोडले.

याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(ब) अन्वये प्रकाश शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. शंतनु निंबाळकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!