spot_img
spot_img
spot_img
spot_img

रावेतमधील बांधकाम साईटवरून ₹७५ हजारांच्या अॅल्युमिनियम प्लेटची चोरी; दोन आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत येथील एका बांधकाम साईटवरून ₹७५ हजार किमतीच्या अॅल्युमिनियमच्या १५ प्लेट चोरी केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. बी. पाटील रोड, लक्ष्मीनगर येथील स्काय एलिगन्स या बांधकाम प्रकल्पावरून अज्ञात चोरट्यांनी १५ अॅल्युमिनियम प्लेट लंपास केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रेम राकेश वाल्मीकी (वय २१) व स्वप्निल शंकर कुडवे (वय २४), दोघेही पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड येथील रहिवासी, यांना अटक केली.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!