spot_img
spot_img
spot_img
spot_img

वाकडमध्ये क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला; चालक जखमी, आरोपीवर गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

वाकड परिसरात कोणतेही कारण नसताना एका चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चालकाच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून वाकड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल संदिपान जोगदंड (वय ३७, रा. आकुर्डी) हे आपल्या मित्रांसोबत चौधरी पार्क, ब्रम्हा सोसायटीसमोर गप्पा मारत उभे असताना रवि विक्रम जाधव (वय ३६, रा. थेरगाव) याने कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!