spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिंदे गावातील लेबर कॅम्पमध्ये दुहेरी मृत्यू; लाकडी पाटाने वार करून कामगाराची हत्या, आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

खेड तालुक्यातील शिंदे गाव परिसरातील युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेडच्या लेबर कॅम्पमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान दुहेरी मृत्यूत झाले. एका कामगाराने सहकाऱ्याच्या डोक्यात लाकडी पाटाने वार करून त्याची हत्या केली. या घटनेत जखमी झालेल्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) आणि अमरूष उरानो (वय ४३, रा. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने चिरंजीत यांच्या डोक्यात लाकडी पाटाने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. झटापटीत आरोपीही गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला.

या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टोले करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!