spot_img
spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याप्रकरणी निगडीत गुन्हा; दोन नागरिकांची ₹६५ हजारांहून अधिक रकमेची फसवणूक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते वापरल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या खात्यामार्फत देशातील दोन नागरिकांची ₹६५,७८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मधुकर जवरे (रा. गणेश कॉलनी, बिजली नगर, चिंचवड) याने बँक ऑफ महाराष्ट्र, आकुर्डी शाखेत खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. संबंधित खात्यातून एकूण ₹१,७०,७५२ रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, त्यापैकी दोन नागरिकांच्या तक्रारींमधील ₹६५,७८४ रुपये या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!