spot_img
spot_img
spot_img
spot_img

गुरुपौर्णिमेनिमित्त स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना अभिवादन; आमदार शंकरभाऊ जगताप यांची बाबासाहेब त्रिभुवन यांनी घेतली भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी आपले राजकीय गुरू स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर उपस्थित होते.

यावेळी बाबासाहेब त्रिभुवन यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, बीड जिल्ह्यातून उपजीविकेच्या शोधात पिंपरी-चिंचवडमध्ये आलेला टाटा मोटर्समधील एक सर्वसामान्य कामगार ते दोन वेळा नगरसेवक होण्यापर्यंतचा प्रवास हा केवळ स्वतःच्या कष्टामुळे नव्हे, तर स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांनी दाखविलेल्या विश्वास, मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळे शक्य झाला.

“गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शन करणारी व्यक्ती नाही, तर सामान्य माणसातील असामान्य क्षमता ओळखून त्याला समाजासाठी घडवणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या संस्कारांचे आणि विश्वासाचे ऋण आयुष्यभर जपत जनसेवेचा प्रवास अधिक प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सुरू ठेवण्याचा आज पुन्हा एकदा संकल्प करतो,” असे मनोगत बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत, गुरूंच्या प्रेरणेतून समाजसेवेचा व विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!