spot_img
spot_img
spot_img
spot_img

टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली शिकाऊ उमेदवारी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व पीएमटी मशीन्स लि. पिंपरी यांच्या सयुंक्त विद्यमाने टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या शिकाऊ उमेदवारी नेमणूक करिता मुलाखती संस्थेमध्ये घेण्यात आल्या. पीएमटी मशीन्सच्या वतीने श्चैत्राली पाटील, वरिष्ठ एचआर मॅनेजर व अजय शर्मा, एचआर मॅनेजर ह्यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेऊन आस्थापने संदर्भातील सर्व माहिती दिली. तसेच शिकाऊ उमेदवारांना एका वर्षाचा कालावधीत र.रु. २०,४००/- इतके विद्यावेतन, कॅन्टीन सुविधा इ. देणार असल्याबाबत सांगितले.

शिकाऊ उमेदवारांना पुढील उच्च शिक्षणासंदर्भात पदविका करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तसेच पुढील कालावधीत वर्क परफॉर्मनुसार कायमस्वरूपी रोजगारही मिळू शकतो असेही प्रशिक्षणार्थींना कळविण्यात आले. यादरम्यान टर्नर ट्रेडचे ६ प्रशिक्षणार्थी व इलेक्ट्रिशियन ट्रेडचे ३ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे आणखीन विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल असेही कळविण्यात आले..

यावेळी संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील ह्यांनी प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन करताना तांत्रिक कौशल्याच्या जोरावर व्यक्तिगत विकास साधून भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत असल्याबाबतही नमूद केले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक रवी ओव्हाळ व शर्मिला काराबळे तसेच निदेशक लांडगे एन.के., विशाल रेंगडे, सीमा जाधव व कार्यालयीन कर्मचारी अभिनव हातगांवकर यांनी सहकार्य केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!