राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरातर्फे २२ जुलै रोजी सदाआनंद नगर येथे उपक्रम; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहरच्या वतीने पावसाळी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सदाआनंद नगर, मंगळवार पेठ, पुणे येथे होणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सदानंद शेट्टी (मा. अध्यक्ष: स्थायी समिती पुणे मनपा ) व सुजाताताई शेट्टी (मा. नगरसेविका पुणे मनपा ) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, या हेतूने छत्री वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांसह पुणे शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष कृष्णा गेडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, माजी नगरसेविका सुजाता गेडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या जनसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात येणार आहे.


