spot_img
spot_img
spot_img

मोशी प्रकरणी सर्वपक्षीय विरोधकांची पोलीस आयुक्तांशी भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी कचरा डेपो येथे निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी आज सर्वपक्षीय विरोधकांनी आणि सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी सहअभियंता योगेश आल्हाट बांधकाम परवाना बांधकाम अतिक्रमण विभागाचे अधिकारी अँथोनी लारा कंपनीचे मुख्य संचालक सीईओ व जबाबदार सर्वच अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तसे निवेदन ही आयुक्तांना देण्यात आले.

याप्रसंगी आयुक्तांशी चर्चा करत सर्वपक्षीय विरोधकांनी आणि सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली स्वतःकडील माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली यावर आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक उत्तरे देत, दोषींना अजिबात सोडणार नाही, विशेष चौकशी समितीची कारवाई सुरूच आहे यावर मी देखील लक्ष ठेवून आहे, अशा प्रकाराना जबाबदारांना अजिबात सोडले जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याप्रसंगी शिष्टमंडळाला दिली.

सर्वपक्षीय विरोधक आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मनसेचे शहर प्रमुख सचिन चिखले, आप से युवक अध्यक्ष विकी पासवटे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, ओबीसी संघर्ष समितीचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष आनंदा कुदळे, प्रदीप पवार, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, हरीश डोळस, प्रबुद्ध कांबळे आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!