spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

तीन नागरिकांची ₹१.१० लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीसाठी स्वतःच्या बँक खात्याचा वापर करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या व्यवहारातून देशातील तीन नागरिकांची एकूण १ लाख १० हजार ३३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित ज्ञानेश्वर भानुसे याने एचडीएफसी बँकेत खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीत वापरण्यास दिले. या खात्यातून एकूण ₹१,१०,३३४ इतके संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले असून, देशातील तीन तक्रारदारांची रक्कम या खात्यात जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!