spot_img
spot_img
spot_img

नांदे परिसरात कोयता बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुस-नांदे रोडवरील सनीज एच फूड्स समोरील मोकळ्या जागेत, नांदे (ता. मुळशी) येथे ही कारवाई करण्यात आली.

या वेळी स्वराज सुरेश ढमाले (वय २४, रा. ढमाले वस्ती, नांदे, पुणे) याच्या ताब्यात सुमारे ५०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांच्या मते, आरोपीने कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे प्राणघातक शस्त्र जवळ बाळगले होते.

विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ८ जुलै ते २१ जुलै २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार, भाला, काठी यांसारखी शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपीस भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत.

शहरात वाढत्या कोयता गँगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!