spot_img
spot_img
spot_img

डांगे चौक परिसरात सोरट जुगारावर छापा; महिला व तरुण ताब्यात

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

वाकड पोलिसांनी डांगे चौक परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून सोरट जुगार खेळणाऱ्या महिला व एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आxx विशाल पवार (वय २०) आणि आकाश शहाजी करंडे (वय २५) हे थेरगाव येथील डांगे चौकाजवळील रस्त्यालगत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपींकडून २४० रुपये किमतीचे जुगार साहित्य आणि ६५० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि आपाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शहरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!