पिंपरी-चिंचवड : नवी सांगवी येथीलश्री गणेश सहकारी बँकनिवडणुकीत श्री. जवाहर ढोरे आणि श्री. अशोक कवडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही नवनिर्वाचित संचालकांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभात बोलताना बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, श्री गणेश सहकारी बँकेने नेहमीच सर्वसामान्य सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विश्वास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामकाजाची परंपरा जपली आहे. सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे आणि सामान्य नागरिकांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या सहकार धोरणांचा मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच केंद्रीय गृह व सहकार मंत्रीअमित शाहयांनी मांडलेली सहकाराची व्यापक संकल्पना देशभर प्रभावीपणे राबविली जात असून, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक मजबूत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
श्री गणेश सहकारी बँक सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत भविष्यात प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



