spot_img
spot_img
spot_img
spot_img

PMPL बसच्या धडकेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; पुनावळे परिसरातील हृदयद्रावक घटना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पुनावळे परिसरात पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रावेत पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुनावळे ते किवळे मार्गावरील पवना पुलाजवळ, तुकाई नर्सरीजवळील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. पीएमपीएमएल बस (MH 12 QG 2079) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसची फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक बसली.

धडकेमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून फिर्यादी आणि त्यांची मुलगी खाली पडल्या. यामध्ये खुशबू या चिमुकलीचा बसच्या मागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

रावेत पोलिसांनी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!