पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
बावधन पोलिसांनी बालेवाडी परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधात कारवाई करत एका ४५ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालेवाडी स्टेडियमच्या सीमाभिंतीलगत असलेल्या सर्व्हिस रोडवर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता आरोपी महिला सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करत, लैंगिक हावभाव व शब्दांचा वापर करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी नफिसा तारीक सिद्दीकी (वय ४५, रा. वारजे माळवाडी, पुणे) हिच्याविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


