spot_img
spot_img
spot_img

पूरग्रस्त नागरिकांची नगरसेविका मनिषा पवार व सोनाली गाडे यांनी घेतली भेट; सुविधांची केली पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : पवना नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या जगतापनगर, थेरगाव येथील नागरिकांची तसेच चिंचवड अनाथ आश्रमातील मुलांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका मनिषा प्रमोद पवार आणि समाजसेविका सोनाली संदीप गाडे यांनी यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या निवास, अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. स्थलांतरित नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित महापालिका अधिकारी आणि प्रशासनाला आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच चिंचवड अनाथ आश्रमातील मुलांचीही त्यांनी आस्थेने विचारपूस करत त्यांच्या राहण्याची व्यवस्था, भोजन आणि आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेतली. संकटकाळात प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्त नागरिकांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष मदत केंद्रात पोहोचून विचारपूस केल्याबद्दल मनिषा पवार आणि सोनाली गाडे यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!