spot_img
spot_img
spot_img

अजितदादांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; वसंत बोराटे यांचे भावनिक आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

९ जुलै २०२६ रोजी असलेल्या आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिक, सोसायटीधारक आणि सहकाऱ्यांना उद्देशून बोराटे यांनी भावनिक आवाहन केले आहे. अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख आजही मनात कायम असल्याने यावर्षी कोणताही वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कोणीही प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, पुष्पगुच्छ, हार किंवा केक आणू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्या सोशल मीडिया किंवा दूरध्वनीद्वारे द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत साधेपणाने वाढदिवस पाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा वसंत बोराटे यांनी व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!