spot_img
spot_img
spot_img

महिलेच्या पर्समधून ८.१० लाखांचे दागिने लंपास; तरुणीविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

आळंदीतील माऊली मंदिर परिसरात एका महिलेच्या पर्समधून तब्बल ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी एका तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लता अंकुश चौधरी (वय ६५, रा. गोळेगाव, ता. खेड) या त्यांच्या बहिणीच्या घरी, माऊली मंदिराजवळील साळी धर्मशाळेसमोर आल्या होत्या. यावेळी आरोपी शिवानी निलेश जाधव (वय २३, रा. आळंदी) हिने फिर्यादींच्या परवानगीशिवाय त्यांच्या हँडबॅगमधील पर्स काढून त्यातील सुमारे ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!