पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
खेड तालुक्यातील वासुली येथील एरोस्पेस कंपनीतून सुमारे २ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉईल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखरराव सत्यनारायण समसानी (वय ३६) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी अब्दुल अहाद अन्सारी (वय ३२, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) याने कंपनीच्या मालकीच्या विविध वजनाच्या एकूण २० तांब्याच्या कॉईल, सुमारे ४५ किलो, ३८ किलो व ९ किलो वजनाचे साहित्य, अंदाजे २ लाख रुपये किमतीचा माल परवानगीशिवाय चोरून नेल्याचा आरोप आहे.
ही चोरी २१ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


