spot_img
spot_img
spot_img

हॉटेलचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; तरुणाला अटक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

काळेवाडी परिसरातील शिवकल्याण रेस्टॉरंटमध्ये चोरी करून सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अधिकराव विश्वासराव भोसले (वय ५३, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांच्या एम.एम. चौकातील शिवकल्याण रेस्टॉरंटच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील व बॅगेतील एकूण सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना २९ जून रात्री १० ते ३० जून सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता शंकर सोपान सागर (वय १८, रा. जगतापनगर, थेरगाव) याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!