spot_img
spot_img
spot_img

ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभा प्रमुखासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, विभाग संघटिका सुजाता नखाते यांच्यासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. उद्योगमंत्री, संपर्कप्रमुख उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला.

नखाते यांच्याबरोबर विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट यांच्यासह काळेवाडी-रहाटणी परिसरातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नखाते यांनी ठाकरे गटाकडून महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या आशा भालेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शहरात शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताकद देणारा पक्ष आहे. नखाते यांच्यासह कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळात आणखी भर पडली असून, तळागाळात पक्षाची ताकद अधिक सक्षम होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!